वॉलमार्ट कंपनी भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी

नवी दिल्ली : ई- कॉमर्स कंपन्यांसाठी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियामवलीत करण्यात आलेल्या बदलानंतर वॉलमार्ट भारतीय बाजारात सकारात्मकच राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

भारतात करण्यात येणाऱ्य़ा गुंतवणुकीत कोणत्याही प्रकारचा नकारात्मक बदल या नियमामुळे होणार नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले. वॉलमार्टने नुकतीच फ्लिपकार्टमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. एफडीआय नियमावलीनुसार देशांतर्गत कार्यरत असणाऱ्य़ा अन्य कंपन्या ई कॉमर्स उद्योगात उतरणार असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लवकरच विदेशी कंपन्यांना एफडीआय नवीन नियमावलीचा फटका बसण्याचा शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतात व्यवसायवृद्धी करण्याचा हेतूने विदेशी कंपन्यांनी आपली गुंतवणुक मोठया प्रमाणात केली आहे. परंतु 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या नवीन ई कॉमर्स पॉलिसी बदलाचा फटका विदेशी कंपन्यांना बसण्याचा अंदाज एका अहवालात नोंदवला आहे. भारतीय बाजारात वॉलमार्ट व फ्लिपकार्ट आपले स्थान मजबूत राखण्याचा मानस असून तो कायम ठेवणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्‍त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)