पंढरपूर – कार्तिकी एकादशी सोहळा दरम्यान पंढरीत गर्दी होऊन करोनाचा प्रसार वाढू नये, म्हणून 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवशी विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी वितरित केलेले ऑनलाईन पास रद्द करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे. यासंदर्भातील माहिती सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
शासन आदेशानुसार 16 नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर खुले केले होते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी दर्शन पासची ऑनलाईन बुकिंग आवश्यक करण्यात आली आहे. मात्र कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 25 आणि 26 नोव्हेंबरला संचारबंदी लागू केली आहे.