नवी दिल्ली – जगातील श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू राहिला आहे. मात्र त्याचेही स्थान 83 व्या स्थानावरून 100 व्या क्रमांकपर्यंत घसरले आहे.
फोर्ब्जतर्फे ही पाहणी केली जात असते. त्यानुसार अर्जेन्टिनाचा फुट्बॉलपटू लिओनेल मेस्सी याने अग्रस्थान राखले आहे. फुट्बॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने मुष्टीयोध्दा फ्लोईड मेवेदर याला मागे टाकले व दुसरे स्थान घेतले. कोहली याच्या विविध जाहिरातींचे उत्पन्नात वाढ झाली असली तरी अन्य परदेशी खेळाडूंचेही उत्पन्न वाढले आहे.