नरेंद्र पाटलांचे आव्हान स्विकारले : खा. उदयनराजे

ना. चंद्रकांत पाटील यांनाही मदतीची करून दिली मदतीची आठवण

सातारा  – दम असेल तर कोठेही बोलवा, असे आव्हान नरेंद्र पाटील यांनी दिल्यानंतर खा. उदयनराजेंनी त्यांचे आव्हान स्विकारत असल्याचे जाहीर केले.

गाठायचे म्हटले तर कोठे ही गाठू शकतो, अशा शब्दात खा. उदयनराजेंनी पाटील यांना इशारादेखील दिला. त्याचबरोबर ना. चंद्रकांत पाटील यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मदत केल्याची आठवण देखील खा. उदयनराजे यांनी करून दिली.

जाहीरनामा प्रकाशनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. उदयनराजेंना आव्हान दिले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. उदयनराजे म्हणाले, मी आव्हान स्विकारले. गाठायचेच म्हटले तर कोठे ही गाठू शकतो, असा इशारा देत ते पुढे म्हणाले, मला त्यांना दाखवून द्यायचे आहे.

स्व.अण्णासाहेब पाटील यांनी असंघटित कामगारांना संघटित करून सुरक्षित करण्याचे काम केले. हे काम करताना त्यांना स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, खा. शरद पवार यांनी साथ दिली. मात्र, मिशी पिळण्याबरोबर कामगारांना ही पिळण्याचा प्रकार सुरू आहे. कामगारांच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. माझे मुंबईला जाणे-येणे होतच असते. तेव्हा अलीकडे तक्रारी निवारणाचे कार्यालय उघडणार आहे, अशा शब्दात खा. उदयनराजेंनी आणखी एक इशारा दिला.

त्या पाठोपाठ ना. चंद्रकांत पाटील यांनी राजांनी मते मागायची नसतात. राजांनी राजा सारखे रहावे, असे नुकतेच विधान केले होते. त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना खा. उदयनराजे म्हणाले, मी मनानी राजा आहे. मात्र, ना. चंद्रकांत पाटील फार वर्षापूर्वी पदवीधरच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा आम्ही मतदान केले म्हणून ते निवडून आले. आज ते कबूल करतील की मला माहित नाही. पण जाऊ द्या. मला जास्त बोलायचे नाही. अशी प्रतिक्रिया खा. उदयनराजे यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.