…तर कॉंग्रेस तिहेरी तलाक कायदा रद्द करणार

नवी दिल्ली – सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा रद्द करणार असल्याचे महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटले आहे. तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना जेलमध्ये पाठवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही देव यांनी केला आहे. आपण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे आभार मानले, असे सुष्मिता देव यांनी सांगितले. अल्पसंख्याकांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज (7 फेब्रुवारी) राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी राहुल गांधींनी मोदी सरकावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींचा चेहरा नीट पाहिला तर तुम्हाला भीती दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले. हा देश एका धर्माचा नाही. हा देश भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आहे.

लढाई दोन विचारधारांमधील आहे. अल्पसंख्याकांनीही या देशासाठी काम केले आहे. एक विचारधारा म्हणते देश सोन्याची चिमणी आहे, याचा अर्थ असा की, देश एक उत्पादन आहे. आमच्या विचारधारेनुसार, देश एक नदी आहे, ज्यात सगळ्यांना जागा मिळायला हवी.

Leave A Reply

Your email address will not be published.