नवी दिल्ली – जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याचे दर वाढले. मात्र रुपया वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले.
दिल्ली सराफ सोन्याचे दर बुधवारी 16 रुपयांनी कमी होऊन 49,484 रुपये प्रति दहा ग्रम झाले. तयार चांदीचा दर मात्र 205 रुपयांनी वाढून 67,673 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
बुधवारी रुपयाचा भाव 9 पैशांनी वधारला. त्यामुळे सोने आयात महागात पडते. भारतात येणारे बहुतांश सोने आयात केलेले असते. त्यामुळे जागतिक बाजारातील सोन्याच्या दराचा आणि डॉलर व रुपयाच्या दराचा भारतातील सोन्याच्या दरावर दैनंदिन पातळीवर परिणाम होत असतो. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,879 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.22 डॉलर प्रति औंस झाले.
अमेरिकेने 2.2 लाख कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर तेथील व्याजदर कमी असल्यामुळे डॉलर इतर चलनाच्या तुलनेत कमकुवत होत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
त्याचबरोबर जागतिक आर्थिक परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येणार नसल्यामुळेही ागतीक पातळीवर गुंतवणूकदार सेफ हेवन समजल्या जाणाऱ्या सोन्याचा काही प्रमाणात आधार घेत आहेत. मात्र भारतात जर रुपया वधारत गेला तर सोन्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो असे विश्लेषकांनी सांगितले.