ऍथलेटिक्‍स स्पर्धा प्रेक्षकांविनाच होणार…

नवी दिल्ली – भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने यंदा होत असलेल्या दोन्ही इंडियन ग्रांप्री ऍथलेटिक्‍स स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे जाहीर केले आहे. पहिली स्पर्धा येत्या 20 मार्च तर, दुसरी स्पर्धा 25 मार्च 2020 रोजी पतियाळातील साई एनएस-एनआयएस संकुलातच होतील, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे.

करोना विषाणूंचा धोका लक्षात घेता प्रेक्षकांना, खेळाडूंच्या कुटुंबीयांना तसेच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचेही महासंघाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

दरम्यान, चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या प्रभावामुळे तसेच धोक्‍यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.