पुणे – फ्लाईंग हॉक्स संघाने कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा 40-34 असा पराभव केला आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजित कुमारांच्या पीएमडीटीए टेनिस लीग स्पर्धेत बाद फेरी गाठली.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम भन्साली याने नील केळकरचा 4-3 असा पराभव करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.
12 वर्षाखालील मुलांच्या गटात फ्लाईंग हॉक्सच्या तेज ओकने शिवम पाडिया याचा 6-0 असा तर मुलींच्या गटात अंजली निंबाळकरने खुशी पाटीलचा 6-0 असा पराभव करीत संघाला आघाडी मिळवून दिली. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सुधांशू सावंतने ऋषिकेश बर्वेचा 6-0 असा पराभव केला. कुमार दुहेरी गटात पार्थ देवरूखकर व साईराज शोत्री या जोडीने प्रणव इंगोळे व रेन मुजगुले यांचा 6-1 असा पराभव केला. 14 वर्षाखालील दुहेरी गटात तनिष बेलवलकर व श्लोक गांधी यांनी वेदांत ससाणे व अथर्व जोशी यांचा 6-3 असा पराभव केला.
सविस्तर निकाल :
फ्लाईंग हॉक्स वि.वि कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स: 40-34 (एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: सृष्टी सूर्यवंशी पराभूत वि श्रावी देवरे 3(5)-4; 10 वर्षाखालील मुले: सक्षम भन्साली वि.वि नील केळकर 4-3;
10 वर्षाखालील मुली: जसलीन कटरिया पराभूत वि मृणाल शेळके 0-4; 12 वर्षाखालील मुले: तेज ओक वि.वि शिवम पाडीया 6-0; 12 वर्षाखालील मुली: अंजली नि.बाळकर वि.वि खुशी पाटील 6-0;
14 वर्षाखालील मुले: सुधांशू सावंत वि.वि ऋषिकेश बर्वे 6-0; 14 वर्षाखालील मुली: कौशिकी सामंत पराभूत वि रुमा गायकैवारी 1-6; कुमार दुहेरी गट: पार्थ देवरूखकर व साईराज शोत्री वि.वि प्रणव इंगोळे व आर. मुजगुले 6-1;
14 वर्षाखालील दुहेरी गट : तनिष बेलवलकर/श्लोक गांधी वि.वि वेदांत ससाने व अथर्व जोशी 6-3; 10 वर्षाखालील दुहेरी गट: नील गोयल व देव गुहालेवाला पराभूत वि आर्यन कीर्तने व संमिहन देशमुख 1-4 ; मिश्र दुहेरी गट: एंजल भाटिया व चिराग चौधरी पराभूत वि डेलिशा रामघट्टा व आरूष मिश्रा 2-6