मीच लालूप्रसाद यांचा वारस : तेजप्रताप

जहानाबाद (बिहार) – लालूप्रसाद यादव यांची मुले तेजप्रताप यादव व तेजस्वी यादव यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जहानाबाद येथे एका प्रचार रॅलीत तेज प्रतापने त्याचा लहान भाऊ तेजस्वीवर टीकेची झोड उठवली. राजदमध्ये आता अनुनय करणाऱ्यांना तिकीट दिले जातेय, अशी टीका तेज प्रतापने केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मीच बिहारचा दुसरा लालूप्रसाद यादव असल्याचे सांगत तेज प्रतापने तेजस्वीला टोला लगावला.

लालूप्रसाद यादव हे तुरुंगात गेल्यापासून पक्षाची संपूर्ण धुरा तेजस्वी यादव सांभाळत आहेत. त्याचा राग देखील तेज प्रतापला असून लोकसभा निवडणुकीत तिकीट देताना तेज प्रतापच्या मर्जीतील नेत्यांना तिकीट दिले नसल्यामुळे आता या दोन भावांतील वाद उफाळून वर आला आहे.

जहानाबाद येथे तेज प्रताप यांच्या मर्जीतील उमेदवार चंद्रप्रकाश यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत त्यांनी तेजस्वीवरच निशाणा साधला. तेजस्वी यांनी तब्येतीचे कारण पुढे करत त्याच्या काही सभा रद्द केल्या आहेत. त्यावरून तेज प्रतापने तेजस्वीवर टीका केली. लालू प्रसाद हे एक स्फूर्तिदायी व्यक्‍तिमत्त्व होते. ते दिवसाला दहा ते बारा कार्यक्रम करायचे तरीही थकायचे नाही. नाहीतर आताचे नेते दोन-तीन कार्यक्रमातच आजारी पडतात, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.