जेएलआरमुळे टाटा मोटर्सला तब्बल 27000 कोटींचा तोटा

मुंबई – टाटा मोटर्सला तिमाहीत 27000 कोटींचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे. जॅग्वॉर लॅन्ड रोव्हरची सातत्याने सुमार कामगिरी झाल्याने हा तोटा झाल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. डिसेंबर अखेरच्या तिमाहीत टाटा मोटर्सला 26 हजार 993 कोटींचा तोटा झाला आहे. याआधीच्या तिमाहीत 1077 कोटींचा फायदा कंपनीला झाला होता. यानंतर 772 कोटींचा फायदा होईल असे वाटले होते.

टाटा मोटर्सने या तोट्याची कारणं देताना चीनमध्ये विक्रीला लागलेली खीळ, वाढते कर्ज आणि वाढलेला उत्पादन खर्च अशी कारणं दिली आहेत. जॅग्वॉर लॅंड रोव्हरच्या टाटा मोटर्सच्या महसुलात सुमारे 72 टक्के वाटा आहे. 2018 मध्ये मात्र या कार्सच्या विक्रीचा आलेख मंदावला. या सगळ्या कारणांमुळेच टाटा मोटर्सला मोठे नुकसान झाले असे कंपनीने
म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युरोपात डिझेलवर चालणाऱ्या जेएलआरच चे प्रमाण 90 टक्के होते. मात्र हळूहळू ही मागणी कमी झाली. कारण ग्राहक हळूहळू हायब्रिड किंवा इलेक्‍ट्रीक कार्सचा पर्याय निवडू लागेल. पर्यावरणात प्रदूषण होऊ नये याबाबत ग्राहक जागरुक असतात. मात्र आता या कारच्या विक्रीचा वेग अत्यंत मंदावल्याने आम्हाला तोटा सहन करावा लागतो आहे असे टाटा मोटर्सने स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)