चेन्नई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन लवकरच त्यांचा मुलगा आणि राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री पदावर बढती देऊ शकतात. या निर्णयाचा पक्षाला 2026 च्या विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री स्टॅलिन 22 ऑगस्टला अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उदयनिधी हे सनातन धर्माचे कट्टर विरोधककासून, त्यांनी त्याबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
2026 च्या विधानसभा निवडणुकीत उदयनिधी पक्षाचा चेहरा असू शकतात, असे डीएमकेच्या सूत्रांनी सांगितले. द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती हवी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती होणार होती, परंतु कल्लाकुराची दारूच्या दुर्घटनेमुळे द्रमुक आणि स्टॅलिन यांनी त्यांचा मुलगा उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री करण्याची योजना पुढे ढकलली होती.
कल्लाकुराची दारू दुर्घटनेत ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. तसेच त्यावरुन त्यांच्यावर देशभर जोरदार टीकाही झाली होती.