इंश्‍योरकोट स्पोर्टसकडे पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाची मालकी

पुणे – इंश्‍योरकोट स्पोर्टस प्रा. लि. ने पुणेरी पलटण टेबल टेनिस ही टीम विकत घेतली असून यंदा मॅनेजमेंट सह अनेक नवे बदल या हंगामात पुणेरी पलटनच्या संघात झाले आहेत.

यासंदर्भात बोलताना कैलाश कांडपाल, सीईओ, इंश्‍योरकोटस्पोर्टस म्हणाले, टेबल टेनिस हा जलद गतीचा असा खेळ आहे ज्यात खूप एकाग्रता लागते. अल्टीमेट टेबल टेनिस मुळे भारतीय खेळाडूंचा खूप फायदा झाला आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांची प्रगती होत आहे. अल्टीमेट टेबल टेनिस मध्ये टीम घेऊन आम्ही त्यांच्या सोबत एकत्र काम करून भारताची आंतरराष्ट्रीय स्थरावर कामगिरी अजून उंचावण्याचा प्रयत्न करू.

पराग अग्रवाल, सहाय्यकसंघप्रशिक्षक, पुणेरी पलटण टेबल टेनिस म्हणाले, आमची टीम संतुलीत आहे कारण आमच्या टीम मध्ये भारतीय तसेच विदेशी अनुभवी व तरुण खेळाडू ह्यांचे संयोजन आहे. अल्टीमेट टेबल टेनिस मध्ये हे पुणेरी पलटण टेबल टेनिस टीमचे पहिले पर्व असणार आहे. आम्हाला फॅन्सला वर्ल्ड क्‍लास टेबल टेनिसचा अनुभव करून द्यायचा आहे. त्याचबरोबर देशासाठी सर्वोत्तम टेबल टेनिस खेळाडू घडविणे हे आमचे ध्येय आहे.

पुणेरी पलटण टेबल टेनिस संघाचे खेळाडू :

1.चुयांग ची युआन
2.हरमीत देसाई
3.अयीखा मुखर्जी
4.सेलेना सेल्वाकुमार
5.रोनित भानजा
6.सबिन विंटर

Leave A Reply

Your email address will not be published.