उन्हाळ्यात कारमधील एसी लावूनही उकाडा जाणवतो ? मग ‘हे’ टिप्स’ वापरून पहा !

उन्हाळ्याच्या दिवसात कारमध्ये प्रवास करताना त्याचे एसी आपल्याला सर्वात जास्त दिलासा देते. परंतु बऱ्याचदा कारमध्ये एसी चालविल्यानंतरही उष्णता जाणवते. जर तुम्हालाही अशा प्रकारची समस्या येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुमची गाडी अगदी छान थंड होईल आणि त्याचा कारच्या माइलेजवरही फारसा परिणाम होणार नाही. पाहुयात, हे उपयुक्त टिप्स.

* नेहमीच स्लो स्पीडमध्ये कारचे एसी सुरू करा :

बरेच लोक कारमध्ये बसून एसी फुल मोडमध्ये बदलतात, हा चुकीचा मार्ग आहे. नेहमीच स्लो स्पीडमध्ये गाडीचे एसी सुरू करा. कारचे एसी फुल मोडमध्ये सुरू केल्यास केवळ त्याच्या इंजिनवर दबाव निर्माण होतो, ज्यामुळे जास्त इंधन खर्च होते. एसी सुरू केल्यावर प्रथम कारची खिडकी उघडा आणि एसी स्लो मोडमध्ये चालू करा. असे केल्याने केबिनमध्ये असलेली सर्व गरम हवा निघून जाईल.

* फास्ट किंवा इमिजिएट कुलिंग वापरू नका :

बहुतांश कंपन्या कारमध्ये फास्ट कुलिंग किंवा इमिजिएट कुलिंग यंत्रणेची सुविधा देतात. आपण कारच्या आत बसताच हे तंत्र आपल्याला त्वरित थंड करते. मात्र, असे केल्याने आपल्या शरीरावर उष्ण आणि थंडीच्या एकत्र अनुभवाचा परिणाम होऊ शकतो आणि यामुळे आपण आजारी पडू शकतो. ही यंत्रणा अत्यंत क्वचितच वापरली पाहिजे. तसेच, उन्हाळ्यात, आपली कार सावलीच्या ठिकाणी पार्क करा. यासह आपल्याला एक्सप्रेस कूलिंग यंत्रणा वापरण्याची आवश्यकता नाही पडणार.

* एसी चा फिल्टर स्वच्छ करा :

उन्हाळ्यात आपल्या कारचे एसी फिल्टर नेहमीच स्वच्छ ठेवा. जर गाडीत एसी सुरू असताना शीतलता कमी करत असेल किंवा मायलेजवर याचा परिणाम होत असेल तर याचा अर्थ असा आहे की एकतर आपल्याला एसी फिल्टर्स बदलावे लागतील किंवा स्वच्छ करावे लागेल. याशिवाय कारला थंड होण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही एसीचा गॅसदेखील तपासू शकता. जर आपण उन्हाळ्यात या टिप्सची काळजी घेत असाल तर कारमध्ये प्रवास करताना आपल्याला उकड्याचा सामना करावा लागणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.