माद्रिद – ऑलिंपिक व जागतिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीनने आगामी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे तिने हा निर्णय घेतला आहे.
मरीन या 25 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत तीन वेळा जगज्जेतेपद मिळविले आहे. तसेच तिने ऑलिंपिकमध्येही सोनेरी कामगिरी केली आहे. जानेवारीत इंडोनेशियात मास्टर्स स्पर्धेच्या वेळी साईना नेहवालविरूद्धच्या लढतीत तिचा गुडघा दुखावला होता. त्यामुळे तिला या सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. तिच्या गुडघ्यवर शस्त्रक्रियाही करावी लागली.