शेवगाव – देशातील नऊ राज्यात एकशे दहा शाखांचा पसारा सांभाळत असतांना आणि त्यातील दहा लाख खातेदारांसी रोजच्या संपर्काशिवाय समाजातील अन्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करण्याच्या श्री रेणुकामातामल्टीस्टेट संस्थेच्या उपक्रमाला तोड नाही. विविध घटकांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित करण्याचा संस्थेचा अजब फंडा आहे.
शिक्षक दिन, अभियंता दिन, जागतिक पर्यावरण दिन, फादर्स डे, मदर डे, डॉक्टर डे अशा विविध निमित्ताने प्रत्येक शाखेच्या पंचक्रोशीतील नागरिकांना शाखेत पाचारण करून त्यांचा यथोचित सन्मान करून संपर्क जोपासला जातो.
समाजाला घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षका प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी श्री रेणुका मल्टीस्टेट संस्थेच्या शाखांमध्ये बोलावून त्यांना गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत कर्मचाऱ्यांचाही गौरव केला जातो. नुकत्याच झालेल्या अभियंता दिनाचे औचित्य साधून त्यांनाही सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याप्रती संस्थेने आपुलकी जागविली आहे. तर येत्या २७ तारखेला जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी पंचक्रोशीतील पर्यटनप्रेमी नागरिकांना बोलावून सन्मानित करण्यात येणार आहे .अशाच प्रकारे जागतिक पर्यावरण दिन, मदर डे , फादर्स डे, डॉक्टर डे असे विविध सोहळे प्रत्येक शाखेत नित्य नेमाने साजरे केले जातात. यावेळी भविष्यातील तरतूद म्हणून कोणी रिकरिंग खाते (आर डी ) सुरु करू इच्छित असेल तर पहिला हप्ताही संस्थे मार्फत भरुन त्यांना रेणुका परिवारात सहभागी करुन घेतले जाते.
याव्यतिरिक्त संस्थेच्या तब्बल दहा लाख खातेदारांचे वाढदिवस संबंधित शाखा मधून न चुकता साजरे केले जातात. वाढदिवस असणाऱ्या खातेदारांच्या अनेकदा ध्यानी मनी नसताना कधी थेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन तर कधी शाखेत बोलावून त्यांचा वाढदिवस संस्थेमार्फत साजरा करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. अशा प्रकारे आपुलकी जपल्याने खाते दारही सुखावला जातो. खाते उघडताना दिलेल्या आधार कार्डावरील जन्म तारखे वरून वाढदिवसाचे नियोजन केले जाते.