लंडन – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 5 बाद 352 धावांची मजल मारुन ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 353 धावांचे आव्हान ठेवले.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात शतकी खेळी करुन आयसीसी टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. शिखरने 20 डावांमध्ये सहा शतक केले आहेत. शिखरने रिकी पॉंटींग आणि कुमार संगकाराचा विक्रम या खेळीदरम्यान आपल्या नावे जमा केला. संगकाराने 56 तर रिकी पॉंटींगने 60 धावांमध्ये 6 शतके झळकावली होती. या यादीमध्ये आता सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज शिखर धवनच्या पुढे आहेत.