शेवगाव – तालुक्यातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, काही आजी, माजी सरपंच, उपसरपंचासह, अनेक कार्यकर्त्यांचा मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश झाल्याची माहिती शिवसेना तालुका अध्यक्ष ॲड . अविनाश मगरे यांनी दिली.
शेवगाव तालुका तसा मुळचा डाव्या विचारांचा लोकनेते स्व . मारुतराव घुले पाटला मुळे तो राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आला. पुढे घुले बंधूनी तो अधिक मजबूत केला. मात्र
आगामी काळातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
मुंबई येथे शिवसेना नेते विश्वनाथ नेरुळकर यांच्या उपस्थितीत सोमवारी( दि.२७) दुपारी तालुक्यातील राष्ट्रवादीचे भातकुडगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य रामभाऊ साळवे, दादेगावचे सरपंच अशोक दारकुंडे, उपसरपंच अरुण दारकुंडे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू तुजारे, नागलवाडीचे सरपंच ॲड. किरण जाधव, माजी सरपंच गोरक्ष नाना खेडकर, मुंगी ग्रामपंचायत सदस्य नितीन घोरपडे, अशोक कांबळे, वाडगावचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, आदींनी सेनेत प्रवेश केला आहे.
या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे, अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, अहमदनगर जिल्हा परिषद बांधकाम समीती सभापती काशिनाथ दाते, मधुकर कराड , अशोक कांबळे ,युवासेना उपप्रमुख सादिक शेख, किसन डाके, चंद्रशेखर ढवळे, अशोक शिंदे, विनोद घोरपडे, किशोर भारस्कर, संभाजी घोरपडे, शेखर मोहिते, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल घुले, लक्ष्मण तासतोडे, दहिगावने जिल्हा परिषद गट प्रमुख देविदास चव्हाण साळवे आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असतांना या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीला धक्का देणारा आहे.