शरद पवारांच्या ‘त्या’ मदतीने बारामतीतील रुग्णांना मोठा दिलासा

बारामती – रेमडीसेव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने बारामतीत रुग्णांचे हाल सुरु झाले होते. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील टाहो फोडला होता. गेली दोन दिवसापासून बारामतीत ही परिस्थिती निर्माण झाली होती.

बारामतीकरांचा आक्रोश पाहून अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीकरांच्या मदतीला धावून आले. 480 इंजेक्शन मोफत वितरीत करत त्यांनी बारामतीकरांना तूर्तास दिलासा दिला.

बारामतीत गेले दोन दिवसापासून रेमडीसेव्हर इंजेक्शनचा तुटवडा होता. तुटवडा म्हणजे इंजेक्शन उपलब्धच नव्हते. त्यामुळे रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांची हाल सुरू होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी 480 इंजेक्शनचे वाटप करण्याच्या सूचना केल्या.

त्यानंतर इंजेक्शन वितरित करण्यात आली. रुग्णांचा प्राधान्यक्रम ठरवून इंजेक्शन विनामूल्य वाटण्यात आली. कोरोनाच्या काळात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीदेखील इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.