फाशी दिली जाणाऱ्या शबनमचा मुलाशी हृदयद्रावक संवाद; 40 मिनिटे मायलेकाची भेट

नवी दिल्ली – खूप अभ्यास कर आणि नव्या आई- बाबांना अभिमान वाटेल असे यश मिळव… मला विसरू नकोस…. पण मी चांगली बाई नसल्याने मला भेटायचा हट्ट धरू नकोस…, हा मनाला पिळवटून टाकणारा सल्ला आहे शबनमचा…. देशात फाशी दिल्या जाणाऱ्या पहिल्या महिलेचा… तिच्या मुलाला दिलेला.

तिने 13 डिसेंबर 2008 रोजी मुरादाबाद कारागृहात बाळाला जन्म दिला होता. त्याला एका मुल न होणाऱ्या एका दाम्पत्याने दत्तक घेतले होते. या दाम्पत्याने 15 दिवसांपुर्वी त्यांच्या खऱ्या आईशी त्याची भेट घालून दिली. सुमारे 40 मिनिटे हा माय लेकरांचा संवाद सुरू होता. शबनम अली या महिलेने प्रियकराशी विवाह करण्यात अडथळा ठरणाऱ्या सात कुटुबियांची कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केली होती. या गुन्ह्यात तिला फाशी ठोठावण्यात आली आहे. तिला फाशी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शबनम सोबत तिचा मुलगा सहा वर्ष कारागृहातच रहात होता. मात्र, त्याच्या भविष्याचा विचार करून अमरोहा येथील बाल कल्याण समितीने या मुलाला बुलंदशहर येथील एका दाम्पत्याला दत्तक दिला. त्याच्या शाळेतही पालक म्हणून या दाम्पत्याचेच नाव लावले आहे. या दाम्पत्याने सांगितले की, ते या मुलाला तीन चार महिन्यातून एकदा आईला भेटण्यासाठी कारागृहात घेऊन जातात.

या मुलाच्या नव्या पालकांनी सांगितले की, शबनम यांना ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आहे त्यात कोणीच काही करू शकत नाही. गेले काही दिवस शबनमला फाशी देणार असल्याच्या बातम्या आम्ही वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पहात आहोत. लवकरच डेथ वॉरंट निघेल. फाशीची तारीख निश्‍चित होईल, त्यावेळी आईशी शेवटची भेट घालून देण्यासाठी आम्ही पुन्हा घेऊन जाऊ.

मुलाचे आवाहन झाले व्हायरल
शबनमच्या मुलाचा फोटो बुधवारी इंटरनेट आणि समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात व्यायरल झाला. त्यात राष्ट्रपती मामा माझी आई शबनमला माफ करा अशी विनंती तो करत आहे. मात्र, या फोटोच्या सत्यतेची खातरजमा होऊ शकली नाही.

होती विद्यार्थीप्रिय शिक्षिका
शबनम ही उत्तर प्रदेशातील मोरादाबाद विभागात अमरोहा जवळील बावनखेरी गावातील आहे. इंग्लीश आणि भूगोल अशा दोन विषयात त्यांनी एम ए केले आहे. ति शाळेत शिकवत असे. तिचा लोकप्रिय शिक्षिका असा लौकिक होता. मात्र, 14 आणि 15 एप्रिल 2008मधील रात्री आपल्या कुटुंबियांनी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांची गळा चिरून हत्या केली. तिचे सलीम या प्रियकराशी असणारे संबंध कुटुंबियांना मान्य नव्हते. त्यामुळे तीने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यावेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.