जागतिक पर्यावरण दिनी ‘सीडबॉल’द्वारे वृक्षारोपण

निगडी – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निगडी येथील अर्थबीट संस्थेच्या वतीने साडेतीन हजार बियांचे गोळे (सीडबॉल) टाकून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनी (5 जून) सकाळी नऊ वाजता पाषाण टेकडी येथे हे वृक्षारोपण होणार असल्याची माहिती संचालिका प्रा. प्राजक्ता नरुटे व चैताली देशपांडे यांनी दिली.

स्थापत्य अभियांत्रिकी आणि मास्टर ऑफ इव्हायरोमेंटल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या प्राजक्ता नरुटे आणि जैविक तंत्र ज्ञानाची मास्टर पदवीधर असलेल्या चैताली देशपांडे यांनी कचरा व्यवस्थापनात स्थिरता, महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धन या त्रिआयामी संकल्पनेतून रद्दीपासून सीडपेपर (बिया असलेला कागद) जैवीक कचरा व गोठ्यातील शेण वापरून सीडबॉल, सॅंपलिंग कप, प्लॅस्टिकविरहीत कुंडी (पॉट) या पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली आहे.

काय आहे “सीडबॉल’

टाकावू पेपरपासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक पेपरमध्ये बियांचा समावेश करून सीड पेपर तयार केला. तसेच जमिनीवरचे विघटन होणाऱ्या पर्यावरण पूरक घटकामंध्ये बियांचा समावेश करून आकर्षक असे “सीडबॉल’ तयार केले जातात. हे “सीडबॉल’ कुठेही जमिनीवर ठेवल्यास पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यापासून रोपटे तयार होते. 6 महिने टिकणारे हे सीडबॉल 15 दिवस पाण्याशिवाय राहू शकतात. पेपर व बॉल मध्ये 5 व 6 बिया समाविष्ट केलेल्या आहे. या उपक्रमातून महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस प्रा. नरुटे व देशपांडे यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.