सातारा – जिल्ह्यात काल (गुरुवार, दि. 18) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार आणखी 132 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांच्या तुलनेत बाधितांची संख्या दुपटीहून कमी झाली. गेल्या 24 तासांत एकही करोनाबळी नसल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे; परंतु मृत्युदर अजूनही तीन टक्के असल्याने चिंता कायम आहे.
सातारा शहरात मंगळवार पेठ दोन, करंजे पेठ, तामाजाईनगर, मोळाचा ओढा प्रत्येकी एक, इतरत्र 14, सातारा तालुक्यात अतीत चार, सैदापूर, खेड, मळ्याचीवाडी, चिंचणेर वंदन प्रत्येकी एक,
कराड शहरात शनिवार पेठ तीन, गुरुवार पेठ, वाखाण रोड, कार्वे नाका प्रत्येकी एक, इतरत्र एक,
कराड तालुक्यात गोळेश्वर, कोयना वसाहत प्रत्येकी दोन, जळगेवाडी, पेरले, तारुख, आटके, येणपे प्रत्येकी एक,
फलटण शहरात लक्ष्मीनगर चार, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, मलठण, पुजारी कॉलनी प्रत्येकी एक, इतरत्र एक, निंभोरे नऊ, तरडगाव चार, साठे फाटा तीन, निंबळक, सांगवी, खुंटे, वाठार निंबाळकर, सोनवडी खुर्द, काळज प्रत्येकी एक,
खटाव तालुक्यात मायणी, औंध प्रत्येकी दोन, खातगुण, कळंबी, चोपडे, राजापूर, ललगुण, वडगाव, येळीव, राहटणी, उंचीठाणे, निमसोड प्रत्येकी एक, माण तालुक्यात राजेवाडी दोन, वावरहिरे, पळशी, दहिवडी, मार्डी प्रत्येकी एक,
कोरेगाव तालुक्यात वाघोली चार, देऊर दोन, कोरेगाव, कुमठे, चांदवाडी, रहिमतपूर, अनपटवाडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात लोणंद पाच, वाई तालुक्यात भुईंज तीन, धनगरवाडी दोन, व्याजवाडी, वेळे, मयुरेश्वर, धोम कॉलनी, वेलंग, जांब किकली प्रत्येकी एक,
महाबळेश्वर शहरात दोन, पाटण तालुक्यात अडुळ, तळमावले, गलमेवाडी प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात वालुथ एक, इतर चार, बाहेरील जिल्ह्यातील पुणे दोन, असे एकूण 132 जण बाधित झाले आहेत. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 61 हजार 751 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावणेचार लाखांहून अधिक करोना चाचण्या झाल्या आहेत.