जाणून घ्या सातारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती

सातारा – जिल्ह्यातील चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शनिवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1710 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयात सत्वशिलनगर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सैदापूर ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष, भादे ता. खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, काळचौंडी ता. माण येथील 84 वर्षीय पुरुष अशा एकूण चार करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

एकूण नमुने -245933
एकूण बाधित -50924
घरी सोडण्यात आलेले -48172
मृत्यू -1710
उपचारार्थ रुग्ण -1042

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.