सातारा : जिल्ह्यातील आणखी ‘एवढे’ नागरिक करोनाबाधित

सातारा – जिल्ह्यात काल (गुरुवार, दि. 19) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 77 नागरिक करोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज किमान दोन करोनाबळी होत होते; परंतु गेल्या 24 तासांत एकही करोनाबळी झाला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात शनिवार पेठ, सदरबझार, गोडोली, शाहूनगर प्रत्येकी एक, इतरत्र एक, वाढे, आकले, गोजेगाव प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यात सावडे दोन, कराड शहर, खेर्डे, कालेटेक प्रत्येकी एक, पाटण तालुक्‍यात वरपेवाडी एक, वाई तालुक्‍यात वाई शहर, भुईंज, वासोळे, कवठे प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यात फलटण शहर तीन, काळज दोन, आसू, कोळकी, वडले, पवारवाडी प्रत्येकी एक,

खटाव तालुक्‍यात खटाव, काटकरवडी, कातरखटाव, नेर, पुसेगाव प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात दहिवडी चार, राजेवाडी, म्हसवड प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्‍यात वाठार स्टेशन सहा, आसनगाव तीन, कोरेगाव दोन, साठेवाडी एक, खंडाळा तालुक्‍यात शिरवळ तीन, अहिरे, लोणंद, देवघर प्रत्येकी दोन, खंडाळा, आसवली, केसुर्डी प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्‍यात भिलार चार, दरे दोन, खिंगर एक, जावळी तालुक्‍यात कुडाळ दोन, हातगेघर, आरडे प्रत्येकी एक, इतर तीन, असे एकूण 77 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 57 हजार 810 वर गेली असून, करोनाबळींची संख्या 1845 आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.