सातारा : दोन करोनाबाधितांचा मृत्यू; 67 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह

सातारा – जिल्ह्यात काल (दि. 21) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर आणखी 67 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्ह्यात करोनाबळींची एकूण संख्या 1809 झाली आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात केसरकर पेठ, मंगळवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र दोन, तासगाव तीन, म्हसवे दोन, देगाव रोड, आसनगाव, भाटमरळी, कोडोली, करंजे प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यात कराड शहर, भरेवाडी, ठाकुरकी प्रत्येकी एक, फलटण तालुक्‍यात फलटण शहर दोन, साखरवाडी, बरड प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात मायणी, वडूज, नागनाथवाडी प्रत्येकी एक, माण तालुक्‍यात मोगराळे चार, गोंदवले बुद्रुक तीन, पिंगळी दोन, पळशी एक, कोरेगाव तालुक्‍यात रहिमतपूर सात, आसनगाव तीन, खंडाळा तालुक्‍यात शिरवळ दोन, पाडेगाव, लोणंद प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्‍यात महाबळेश्वर, पाचगणी, मेटगुताड प्रत्येकी एक, वाई तालुक्‍यात वाई शहर, वयगाव प्रत्येकी एक, जावळी तालुक्‍यात कुडाळ पाच, भिवडी एक, इतर सहा, बाहेरील जिल्ह्यांमधील वायनाड (केरळ) एक, असे 67 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात बाधितांची संख्या गेल्या एक-दोन दिवसांपासून थोड्या प्रमाणात का होईना वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 55 हजार 879 झाली असून, उपचारांखालील रुग्णसंख्या एक हजारच्या आत आहे.

दरम्यान, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाता उपचार सुरू असताना रानगेघर, ता. जावळी येथील 75 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शिरंबे, ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय महिला, अशा दोन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.