स्पष्टवक्ता कोणालाच आवडत नाही – पंडित

नवी दिल्ली – संजय मांजरेकरला मी त्याच्या लहानपणापासून ओळखतो. तो त्याचे मत स्पष्टपणे मांडतो. अर्थात हा स्वभाव प्रत्येकाला आवडतो असे नाही. प्रत्येकाला त्याच्या तोंडावर सत्य बोलण्याचा त्याचा स्वभाव आहे. समालोचक म्हणून त्याने जी मते व्यक्त केली त्याचे टायमिंग चुकले असेल मात्र केवळ नुकसान होऊ नये म्हणून फक्त गोड बोलणे त्याला जमत नाही आणि त्याचा हाच स्वभाव त्याला नडला, अशा शब्दात मुंबईचे माजी रणजीपटू व प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी संजय मांजरेकर यांची बाजू घेतली आहे.

दरम्यान, हर्षा भोगले आणि रवींद्र जडेजा यांच्यावर अत्यंत विक्षिप्त शब्दांत टीका करणाऱ्या माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या करारबद्ध समालोचकांच्या पथकातून गच्छंती केली आहे.

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेतील धर्मशालातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, त्या सामन्यात समालोचकांच्या पथकात मांजरेकर उपस्थित नव्हते. मात्र, त्यामागचे खरे कारण कोणालाही समजले नव्हते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.