Saif Ali Khan Net Worth: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. काल रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात घुसल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर मुंबईतील हाय सिक्युरिटी सोसायटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सैफ अली खानच्या संपत्तीवरही चर्चा होत आहे. त्याची संपत्ती किती हे जाणून घेऊया..
1200 कोटींची निव्वळ संपत्ती –
सैफ अली खान हा एक यशस्वी अभिनेता असून तो राजघराण्यातील आहे. अशा स्थितीत त्याची मालमत्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याच्या रिअल इस्टेटमध्ये मुंबईत 103 कोटी रुपयांचे घर आणि हरियाणामध्ये 800 कोटी रुपयांचे भव्य पतौडी पॅलेस यांचा समावेश आहे. सैफची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी 10 ते 15 कोटी रुपये आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 ते 5 कोटी रुपये घेतो.
पतौडी पॅलेस प्रसिद्ध –
सैफ अली खानची सर्वात मौल्यवान मालमत्ता हरियाणामध्ये स्थित पतौडी पॅलेस आहे. रिपोर्ट्सनुसार त्याची किंमत जवळपास 800 कोटी रुपये आहे. 10 एकरात पसरलेल्या या रॉयल प्रॉपर्टीमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. रणबीर कपूरच्या ‘एनिमल’, मंगल पांडे’ आणि ‘वीर जारा’ सारख्या हिट चित्रपटांचे शूटिंग येथे झाले.
स्वित्झर्लंड मध्ये देखील मालमत्ता –
सैफने स्वित्झर्लंडमध्ये 33 कोटी रुपयांची मालमत्ताही खरेदी केली आहे. हा आलिशान बंगला त्याची लक्झरी जीवनशैली दर्शवतो. सैफने व्यवसायाच्या जगातही आपले पाय घट्ट रोवले आहेत. त्याने कपड्यांचे ब्रँड तसेच स्पोर्ट्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यातून त्याला मोठे उत्पन्न मिळते.
लक्झरी कारचे कलेक्शन –
सैफ अली खानला आलिशान कारचा शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास 350डी, लँड रोव्हर डिफेंडर 110, ऑडी क्यू7 आणि जीप रँगलर यासह अनेक आलिशान कार आहेत. सैफ दरवर्षी मोठी कमाई करतो. राजघराण्यातील असल्याने देशातील अनेक शहरांमध्ये त्याची मालमत्ता आहे. याशिवाय त्याने परदेशातही गुंतवणूक केली आहे.