पुढील वर्षात सरकारी बॅंका नफ्यात येण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – सरकारी बॅंका येणाऱ्य़ा आर्थिक वर्षाच्या अखेरीस नफ्यात येतील असे संकेत मिळत आहेत. 2019-20 च्या अखेरीस सरकारी बॅंकांना 23 ते 37 हजार कोटींचा निव्वळ नफा होईल, असे इक्रा या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.

चार वर्षातील तोट्यानंतर मार्च 2020 च्या अखेरीस सरकारी बॅंका किमान 23 हजार कोटी तर जास्तीत जास्त 37 हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवतील. या बॅंकांच्या बुडीत कर्जांचे प्रमाणही कमी होईल, असा अंदाज या अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. सरकारी बॅंकांच्या बुडीत कर्जांच्या प्रमाणाबाबतही या अहवालात दिलासाजनक अंदाज स्पष्ट करण्यात आला आहे.

मार्च 2019 अखेरीस एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण 10.9 तर निव्वळ बुडीत कर्जांचे प्रमाण 5.4 टक्के इतके असेल असा अंदाज देण्यात आला आहे. बॅंकांची परिस्थिती सुधारण्याची शक्‍यता असून मार्च 2020 अखेरीस एकूण बुडीत कर्जांचे प्रमाण 8.1 ते 8.4 आणि निव्वळ बुडीत कर्जांचे प्रमाण 3.5 ते 3.6 टक्‍क्‍यांपर्यंत घटेल, असा अंदाजही या अहवालात नोंदवण्यात आला आहे. सरकारकडून 48 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवल पुरवठ्याचाही फायदा बॅंकांना होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)