सादिया शेखचं दोनदा केलं होतं ‘मतपरिवर्तन’; मात्र अखेरीस ‘इसिस’मध्ये दाखल

पुणे – पुण्यातून अटक केलेल्या युवतीचे दोनदा मतपरिवर्तन केले होते. मात्र अखेरीस ती इसिसमध्ये दाखल झाली, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

सादिया अन्वर शेख हीला येरवड्यातून प्रथम 2015मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2018मध्ये तिला पुन्हा अटक करण्यात आली होती.

दोन्ही वेळा तिचे मत परिवर्तन करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र, तिचे मत परिवर्तन अयशस्वी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिला पुन्हा जुलैमध्ये अटक करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात तिच्यावर पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले.

एनआयएच्या रडारवर ती 2015मध्ये ती पहिल्यांदा आली. त्यवेळी ती अवघी 15 वर्षाची होती. समाज माध्यमांमध्ये ती धर्मांध मजकूर पसरवत असे. फरारी डॉ. झाकीर नाईक हा तिच्या प्रेरणास्थानांपैकी एक होता.

महाराष्ट्र एटीएसने 2015मध्ये तिचे मतपरिवर्तन घडवून तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले. मात्र तिचा समाज माध्यमांद्वारे धर्मांधतेचा प्रसार पुन्हा सुरू झाला. त्यानंतर 2018मध्ये तिला काश्‍मिर पोलिसांनी अटक केली. त्यांनी तिचे मतपरावर्तन करून तिला तिच्या आईकडे सोपवण्यात आले.

सादिया ही इस्लामिक स्टेट खोरासान, इस्लामिक स्टेट जम्मू काश्‍मिर, अल कायदा, अन्सर घाजवत उल हिंद या संघटनांच्या पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि श्रीलंकेसह अन्य देशातील हस्तकांच्या संपर्कात होती. फिलिपाईन्सच्या कारे आएशा हमीदोन हीच्याही ती संपर्कात होती. मनिला येथे जाऊन एनआयएच्या अधिकाऱ्यांनी हमीदोनची चौकशी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.