Rupee Depreciation : रुपयाच्या मूल्यात मोठी ‘घट’

मुंबई – जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे क्रुडचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचा डॉलर वधारत आहे. या कारणामुळे भारतीय रुपयाचे मूल्य मंगळवारी मोठ्या प्रमाणात कमी झाले.

मंगळवारी भारतीय रुपयाचा दर 87 पैशांनी कमी होऊन प्रती डॉलरला 73.38 रुपये या पातळीवर गेला. याबाबत विश्‍लेषकांनी सांगितले की, अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलर वधारत आहे.

त्याचा परिणाम भारताच्या रुपयास इतर देशांच्या चलनावर होत आहे. डॉलरमधून अधिक परतावा मिळणार असल्यामुळे भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक कमी करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.