प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजी करणे महत्वाचे – रोहित शर्मा

File photo

न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या सामन्यानंतर व्यक्त केली प्रतिक्रिया

वेलिंग्टन – न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने अखेरच्या सामन्यानंतर बोलताना संघातील आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीबद्दल खंत व्यक्त करताना सांगितले की, विश्‍वचषक स्पर्धा ही आता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना संघातील आघाडीच्या फळी कडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. जर विश्‍वचषक स्पर्धा भारतीय संघाला जिंकायची असेल तर संघातील खेळाडूंना मुख्यत्वे आघाडीच्या फळीतील फलंदाजांना प्रतिकूल परिस्थीतीत चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, वेस्टपॅक स्टेडियमवरिल खेळपट्टीचे आम्ही निरक्षीण केले तेंव्हा आम्हाला लक्षात आले की, ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की आगामी विश्‍वचषकात अशा प्रकारच्या खेळपट्टीवर आम्हाला फलंदाजी करावी लागल्यास आम्ही त्या वेळीच्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे करु हे तपासायचे होते. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आमचा निर्णय सामन्याच्या सुरूवातीलाच चांगलाच अंगलट आला होता. आम्ही 18 धावांतच आमच्या चार महत्वाच्या विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर आमच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी ओळखून फलंदाजी केली. सुरूवातीला 4 बळी गमवावे लागल्यानंतर आमच्य धावगतीला ब्रेक लागलेला होता. मात्र, त्यानंतरही आम्ही 252 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी होउ शकलोत. त्यामुळे जरी या पुढे आम्हाला अशा प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजी करावी लागली तरी आम्हाला आता समजले आहे की नेमके काय करायला हवे.

मालिका विजयाबाबत बोलताना रोहित म्हणाला की, भारतीय संघ 1967 साली प्रथम न्यूझीलंड येथे एकदिवसीय मालिका खेळण्याकरीता आला होता. त्यानंतर आता पर्यंत भारताला न्यूझीलंड येथे मालिका विजय मिळवता आला नव्हता. मागच्या वेळी तर आम्ही मालिका 4-0 अशा फरकाने मालिका गमावली होती. मात्र, यावर्षी आम्ही येथे 4-1 अशा फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण आम्हाला केवळ चांगली कामगिरी करावयाची आहे आणि तश्‍या प्रकारची कामगिरी आम्ही गेल्या आठ ते दहा महिण्यात करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.

न्यूझीलंडचा संघ हा चांगला समतोल असलेला संघ आहे. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज यांच्या व्यतिरिक्त चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत त्यामुळे ते कोणत्याही क्षणी आपला खेळ उंचावून विजय मिळवण्याची क्षमता ठेवतात आणि शा संघा विरुद्ध तुम्ही 4-1 अशा फरकाने मालिका जिंकता हे कोणत्याही संघासाठी मनोधैर्य उंचावणारी गोष्ट आहे. असेही रोहित यावेळी म्हणाला.

तसेच तो पुढे म्हणाला की, चौथ्या एकदिवसीय सामन्यात आमचा संघ केवल 92 धावांमध्येच गारद झाला होता. त्याचा परिणाम आम्ही तो सामना आठ गड्यांनी गमावला. तर, अखेरच्या सामन्यातही आम्हाला अश्‍याच काहिशा परिस्थीतीचा सामना करावा लागला होता. कारण आम्ही पहिल्या 10 षटकांत 4 बाद 18 धावांच करु शकलो होतो. त्यानंतर मात्र आमच्या मधल्या फळीतील अंबाती रायुडू आणि विजय शंकरयांनी सावध खेळी करत 98 धावांची भागीदारी करत संघाला शंभरी पार करुन दिली. तर, त्यानंतर केदार जाधव आणि हार्दिक पांड्यायांनी चांगला खेळ करत आम्हाला 252 धावांची मजल मारुन दिली. त्यावरुन आमच्या मधल्या फळीतील फलंदाज प्रतिकूल परिस्थीतीत संघाचा दाव सावरण्यास समर्थ असल्याचे या सामन्यानंतर समजून येते असेही तो यावेऴी म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)