#CWC19 : मी बाद नव्हतो – रोहित शर्मा

मॅंचेस्टर – वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मी बाद नव्हतो असे भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने आपल्या अधिकृत ट्‌विटरद्वारा मत व्यक्त केले आहे. केमार रोच याच्या षटकांत यष्टीरक्षक शाय होप याने त्याला झेलबाद केल्याचे अपील केले होते व तिसऱ्या पंचांनी रोहित बाद असल्याचा निर्णय दिला होता.

मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी रोहित नाबाद असल्याचा निर्णय दिल्यानंतर विंडीजच्या खेळाडूंनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसरे पंच मायकेल गॉफ यांनी विंडीजच्या बाजूने कौल दिला. बॅटीला चेंडू लागल्याचा आवाज आला होता. त्याचा आधार घेत त्यांनी हा निर्णय दिला असावा असे रोहित याने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.