राजकीय कारणामुळे चौकशीला उशीर – रॉबर्ट वढेरा

नवी दिल्ली – जर मी बेकायदेशीर काम केले होते तर मग सरकारला चौकशी करण्यासाठी चार वर्षाचा वेळ का लागला, असा सवाल जयपूर येथे झालेल्या कथित जमीन घोटाळाप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांनी केला आहे.

ते मंगळवारी जयपूर येथे सक्‍तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर झाले. याआधी फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आपण आपल्या 75 वर्षीय आईसोबत ईडीसमोर हजर होण्यासाठी आलो आहोत. माझ्या आईने कुटुंबातील तीन व्यक्‍तींना गमावले आहे. मात्र, माझ्यासोबत असल्याने तिलाही आरोपी करण्यात आले आहे.

रॉबर्ट वढेरा यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका कार दुर्घटनेत त्यांच्या बहिणीचा तसेच डायबेटिजमुळे भावाचा आणि वडिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर आपण आईला नेहमी आपल्यासोबत ठेवत होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.