अनिल कुंबळेचा ‘तो’ विक्रम मोडण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आश्विन म्हणाला…

नवी दिल्ली  – रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लड विरुद्द तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या ड़ावात जोफ्रा आर्चरची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 400 विकेट्सचा टप्पा केला. आश्विनने हा कारनामा फक्त 77 कसोटी सामन्यात केला आहे. तो भारताकडून सर्वाधिक जलद 400 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

अनिल कुंबळेचा 619 विकेट्सचा विक्रम मोडू शकतो आश्विन
रविचंद्रन आश्विनने वेस्टइंडीज विरुद्ध 2011 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर भारताकडून खेळताना त्याने सातत्याने विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने आतापर्यंत 77 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना 401 विकेट्स मिळवल्या आहेत. जर आशाच प्रकारे आश्विनने आपल्या कामगिरीत सातत्य राखले, तर तो अनिल कुंबळेचा 619 विकेट्सचा विक्रम लकरच मोडीत काढू शकतो.

विक्रमांबद्दल विचार करणे खूप पूर्वी बंद केले आहे
एका आभासी पत्रकार परिषदेत आर आश्विनला विचारण्यात आले की, तू अनिल कुंबळेंचा 619 विकेट्सचा विक्रम मोडू शकतो का ? या प्रश्नाचे उत्तर देताना आश्विन म्हणाला, ‘तुम्ही जर व्यावहारिकदृष्ट्या पाहिले तर मी 18 बळी दूर आहे. मी बर्‍याच दिवसांपूर्वी या सर्व विक्रमांचा विचार करणे बंद केले आहे. हे मी काय करू शकतो, मी कसे चांगले करु शकतो, संघासाठी मी आणखी काय चांगले करू शकतो याबद्दल आहे.’

आश्विन पुढे बोलताना म्हणाला, ‘मला एक व्यक्तिगत आणि क्रिकेटपटू म्हणून चांगले व्हायचे आहे. यामुळेच मी खरोखर आनंदी आहे, मी माझ्या खेळाचा आनंद घेत आहे आणि गेल्या 15 वर्षांत मी केलेले सर्वोत्तम काम मी पुढे सुरु ठेवू इच्छित आहे. यावेळी, मी जास्त विचार करू नये.

बायो बबल पासून खेळाडूंची चांगली बॉन्डिंग झाली
बायो बबल मध्ये चांगली बॉन्डिंग झाली यावर बोलताना आर आश्विन म्हणाला, ‘हो, आमच्याकडे हॉटेलची मोठी ठिकाणे आहेत, परंतु आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. आम्ही स्वतः मनोरंजन करतो. बायो बबल टीमचे बाँडिंग बर्‍यापैकी चांगले करते. मला असे वाटते की बायो बबलमुळे संघाची बॉन्डिंग सुधारली आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.