अयोध्येत राममंदिर उभारले जाईल – योगी आदित्यनाथ

बिहार सरकारची कामगिरी उत्तम

पाटणा – बिहारमध्ये नितीशकुमार आणि सुशील मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कामगिरीमुळे सामान्य लोकांचे बिहारबाबतच्या धारणेत परिवर्तन झाले आहे असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानीं म्हटले आहे. आम्ही विरोधकांसारखे देश तोडण्याची भाषा करत नाही. तसेच आम्ही शहीद होणाऱ्या आमच्या प्रत्येक जवानांसाठी सीमेपलीकडचे 100 सैनिक मारण्यावर विश्‍वास ठेवतो, असे त्यानी सांगितले. त्यांनी बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आलेले परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही असे ते म्हणाले.

पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. भगवान रामाच्या जन्मस्थानी येणारे भाविक आता अयोध्येत येतात. फैजाबाद जिल्ह्यात जात नाहीत आणि कुंभ मेळ्याला येणारे प्रयागराजला येतात अलाहाबादला नव्हे. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशमध्ये खूप काही होणार आहे. चिंता करू नका, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. आदित्यनाथ सरकारने आपल्या अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)