वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण करणार- राजनाथ सिंह

लखनौ – भाजपचे लोकसभा उमेदवार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये रोड शो करत मोठे शक्‍ति- प्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात यात सहभागी झाले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने घातलेल्या 72 तासांच्या बंदीमुळे ते या रोड शो मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. यावेळी उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा उपस्थित होते. हा रोड शो पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या आधी राजनाथ सिंह यांनी हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, मी अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात आहे. वाजपेयी यांनी या मतदारसंघातून अनेक वेळा निवडणूक लढविली होती. लखनौमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. हा भाजपचा गड मानला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.