राजस्थानात लोकसभा निवडणुका भाजपाला जड जाणार

-भाजपाच्या इच्छुक उमेदवारांत चलबिचल; मोदींची लोकप्रियता कायम

-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम

जयपूर – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची अस्वस्थता वाढवली आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यातच कॉंग्रेसने मुसंडी मारल्यामुळे कार्यकर्त्यात चिंता निर्माण झाली आहे.

राजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 25 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. राजस्थानमध्ये 25 जागांपैकी 18 खुल्या प्रवर्गासाठी, 4 अनुसूचित जाती, तर 3 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या सर्व जागांवर पक्षाला निर्भेळ यश मिळविले होते. मात्र, 2014 च्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची स्थिती
बदलली आहे. विधानसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती लोकसभेत होऊ नये, यादृष्टीने भाजपाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डिसेंबर 2018 मध्ये 199 जागांसाठी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाला 72, कॉंग्रेसला 100, तर अपक्ष व इतरांना 26 जागांवर विजय मिळाला. पण 2018 साली चित्र पूर्ण पालटले. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी मतदानयंत्रांतून उमटली आणि भाजपाच्या हातातून हे राज्य गेले.

अर्थात प्रशासनाकडे दुर्लक्ष, अनेक प्रश्न व समस्या रेंगाळत पडून राहणे, मंत्री व आमदारांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनीच न ऐकणे यामुळे लोकांत मोठी नाराजी होती. मध्यम जातींच्या आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांची आंदोलने याकडेही वसुंधरा राजे यांनी गांभीर्याने पाहिले नाही, अशी तक्रार होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांत दिसला.

बदलत्या राजकीय समीकरणांमुळे 2014 प्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी सध्या तरी अवघड दिसत आहे. कदाचित विधानसभा निकालांचीच पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता अधिक. विधानसभा निवडणूक स्थानिक तर लोकसभा राष्ट्रीय मुद्‌द्‌यांवर लढली जाते. असे असले तरी मतदारांची मानसिकता व राजस्थानमधील राजकीय स्थिती यांवरच राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळेच भाजपाने बुथनिहाय तयारी सुरू केली आहे.

पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडियाचाही विधानसभा निवडणुकीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परिश्रमांमुळेच कॉंग्रेसला यश मिळू शकले. या यशानंतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे अनेक मतदारांच्या प्रतिक्रियांतून दिसून आले आहे. नाराजी होती ती मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल. ती व्यक्त करून झाली. या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता महत्त्वाचा मुद्द ठरणार की लोकसभेतही लोकांना बदल हवा, हे निवडणुकांतून समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)