पंजाबमधील निष्क्रिय आमदारांवर होणार कारवाई – कॅ. अमरिंदर सिंग

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. एनडीएला जरी घवघवीत यश मिळाले असले तरी, काही पंजाबमध्ये मोदी त्सुनामी रोखण्यात मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांना अतुलनीय यश आले आहे. पंजाबमधील 13 पैकी कॉंग्रेसने 8 जागांवर यश मिळवले आहे. असे असले तरी सिंग हे कारवाईच्या मूडमध्ये आहेत. त्याचे कारण निवडणुकीपूर्वीच सिंग यांनी निवडणुकीत काम न करणाऱ्या मंत्री आणि आमदारांवर कारवाईंचे संकेत दिले होते. ज्या मंत्री, आमदारांनी निवडणुकीत काम केले नाही त्यांच्यावर कारवाई करणार असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

पाच ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार हरले आहेत. या मतदारसंघात 12 मंत्री येतात. जर सिंग यांनी कारवाईचा बडगा उगारला तर 12 मंत्र्यांना हे मंत्रिमंडळातून सुट्टी मिळू शकते. खरंतर निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली होती. आता ही फक्त धमकी नव्हती असे सिंग यांनी म्हटले आहे.

मंत्रिपदावरून हकालपट्टीवरून झालेल्या आमदारांना पुढे कुठल्या समितीतही जागा मिळणार नाही तसेच पुढच्या निवडणुकीतही तिकीट कापली जाईल असेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शनिवारी पंजाबमधील निवडणुकांवरही चर्चा करण्यात आली. त्यावेळी सिंह उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.