पुणे – जागेतील बांधकामाची तोडफोड करुन जागेचा ताबा हवा असेल तर दहा लाखाची खंडणी द्यावी लागेल असा दम घर मालकास भरण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी समीर शेंडगे(33) व वैभव दुर्गे(32) यांच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, देवाराम मालाराम चौधरी(47,रा.बावधान) यांची कोंढवा येथे जागा आहे. या जागेवर आरोपींनी अतिक्रमण करुन पत्र्याचे शेड व संडास पाडून टाकले. तेथे बेकायदेशीर ताबा मिळवल्यावर देवाराम यांना जागा हवी असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.