पुणेकरांनो 11च्या आत घरात व्हा! संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तींनी ओळखपत्र बाळगणे बंधणकारक

- दोन दिसवात 1 हजार 700 जणांवर कारवाई

पुणे – शहरात रात्रीच्या संचारबंदीची कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. रात्री अकरानंतर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तींना यातून वगळण्यात आले असले तरी त्यांच्याकडे ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. यामुळे संचारबंदीचे पालन करावे असे आवाहन सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना सह पोलिस आयुक्त डॉ. रविद्र शिसवे यांनी सांगितले की, सुरूवातीच्या लॉकडाऊनच्या कालावधीत पुणेकरांनी नियमांचे पालन करून कोरोना लढ्यात आपले योगदान दिले आहे. त्यामुळे आता देखील नियम व अटींचे पालन करून प्रशासनाला नागरिक सहकार्य करतील यात शंका नाही.

दरम्यान शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क न घालता फिरणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिला आहे. मागील दोन दिवसात पुणे पोलिसांनी 1 हजार 713 जणांवर मास्क न वापरल्या प्रकरणी आठ लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.

आज तागायत मास्क कारवाईमध्ये सुमारे 2 लाख 53 हजार जणांवर कारवाई केली आहे.. पोलिसांकडून सध्या चौकात थांबून मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात आहे. तसेच, प्रवाशी कारमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्यावर कारवाई करून पाचशे रूपयांचा दंड वसूल केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.