पुणे – आगामी निवडणूक जिंकून महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे 36 सेल कार्यरत ठेवण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि तरूण फळीची मोट बांधत पक्षाकडून शहरासाठी समंन्वय समिती नेमण्यात आली आहे.
त्याअंतर्गत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदांची जबाबदारी देण्यात आली असून तरूण कार्यकर्त्यांकडे पक्षाचे उपक्रम, कार्यक्रम राबविण्यासाठी विधानसभा मतदारसंघ आणि पक्षाच्या वेगवेगळ्या सेलची समंन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर असून त्या अनुषंगाने शहर संघटन आणखी मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
यांच्याकडे निरीक्षक पदाची जबाबदारी
1) कमलताई ढोले पाटील (वडगावशेरी विधानसभा)
2) रवींद्र माळवदकर (कॅन्टोन्मेंट विधानसभा)
3) अंकुश काकडे (कोथरूड विधानसभा)
4) राजलक्ष्मी भोसले (पर्वती विधानसभा)
5) दीपक मानकर (खडकवासला विधानसभा)
6) अप्पा रेणूसे (कसबा विधानसभा)
7) ऍड. भगवान साळूंखे (शिवाजीनगर विधानसभा)
8) ऍड. औदुंबर खुने-पाटील (हडपसर विधानसभा)
…असे असतील समन्वयक
- प्रदीप देशमुख (हडपसर विधानसभा, महिला, माहिती अधिकार, शासकीय समिती, लिगल सेल, सोशल मीडिया, आंदोलन, आजी व माजी नगरसेवक),
- महेश हांडे (वडगावशेरी विधानसभा, कोथरुड विधानसभा, युवती, डॉक्टर, सहकार, क्रीडा, उद्योग-व्यापार, दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक
- संदीप बालवडकर (पुणे कॅंन्टॉन्मेंट विधानसभा, पर्वती विधानसभा, सामाजिक न्याय, ओ.बी.सी., प्रचार-प्रसिद्धी), दीपक कामठे (शिवाजीनगर विधानसभा, विद्यार्थी, पंचायत राज, कामगार सेल,वाहतूक, ग्राहक संरक्षण सेल),
- अब्दुल हाफीज (कसबा विधानसभा, खडकवासला विधानसभा, युवक, अल्पसंख्यांक, व्यसनमुक्ती, सेवादल,एल.बी.जी.टी., अर्बन सेल) याशिवाय
- राजलक्ष्मी भोसले यांच्याकडे बुथ कमिटी पदाची जबाबदारी असून दीपक जगताप तसेच सचिन पासलकर यांच्याकडे बुथ कमिटी सहायक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.