Pune Crime : समर्थ पोलिसांनी वॉंण्टेड पाप्या जाधवला ठोकल्या ‘बेड्या’

सराईत झुरळ्याच्या मदतीने केली वाहन चोरी

पुणे – वाहन चोरीच्या गुन्हयात वॉंण्टेड असलेला सराईत गुन्हेगार पाप्या जाधवला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. पाऱ्या जाधवला खडक पोलिसांनी तडीपार केले आहे तर समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्हयात तो वॉण्टेड होता.

सुरज उर्फ पाप्या जाधव(20, रा.भवानी पेठ) हा तडीपारीचा भंग करुन सार्वजनीक रस्त्यावर कोणाची तरी वाट बघत असल्याची खबर पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना मिळाली होती. त्यानूसार समर्थ पोलिसांनी सापळा रचला. पाप्याने पोलिसांना बघताच पळ काढला, मात्र काही अंतरावरच पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले.

पाप्याला परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी दोन वर्षाकरीता 17 डिसेंबर 2020 रोजी तडीपार केले आहे. त्याला पोलिशी खाक्‍या दाखवताच त्याने झुरळ्या उर्फ आकाश पाटोळे सोबत समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऍक्‍टीवा गाडी चोरल्याची कबुली दिली. त्याच्यावर चोरीसह एकूण 17 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिती, हवालदार संतोष काळे, सुशिल लोणकर, सुभाष पिंगळे, पोलीस शिपाई निलेश साबळे, हेमंत पेरणे, शाम सुर्यवंशी, सचिन पवार, सुमित खुट्टे, विठ्ठल चोरमले, सुभाष मोरे, महेश जाधव यांच्या पथकाने केली. याप्रकरणाचा तपास हवालदार विजय कदम करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.