Pune Crime | बोपदेव घाटात लूटणाऱ्या टोळीस फलटन मधून ‘अटक’; पोलिसांनी वेषांतर करुन काढला माग

पुणे – बोपदेव घाटात दुचाकीवरील दांम्पत्यास दमदाटी करुन मोबाईल चोरणाऱ्या टोळक्‍यास कोंढवा पोलिसांनी फलटन तालूक्‍यातील पकडले आहे. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे सात व तीन दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले आहे. एकूण 10 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यासाठी कोंढवा पोलिसांचे एक पथक फलटन तालूक्‍यातील एका गावात वेषांतर करुन काही दिवस राहिले होते.

ओमकार हिंदुराव शिरतोडे दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असे तिघे( रा.मुंजवडी , ता.फलटन , जि.पुणे), दिपक वावा भंडलकर, ऋषीकेश प्रलाद बोडरे )दोघे रा. खुंटे ता. फलटण, जि. सातारा), अभिजित ऊर्फ आवा अंकुश जाधव ( रा.चौधरवाडी ता.फलटण जि.सातारा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि .4/4/21 रोजी रात्री 11 वा सुमारास बोपदेव घाटातुन मोटर सायकल वरुन फिर्यादी बाळासाहेब सुभाष भिंताडे व त्यांची पत्नी वैजंती प्रवास करत पुण्याकडे येत होते. त्यांना दोन पल्सर मोटर सायकल वरुन आलेल्या 6 आरोपीनी आडवुन दमदाटी व धमकी देवुन फिर्यादी यांचा 7000 रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरी चोरला. यानंतर आरोपी पल्सर मोटर सायकल वरुन सासवडच्या दिशेने निघुन गेले होते. या प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन गोरे ,पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे व तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरू केला . पोलीस नाईक संजीव कळंबे यांना मिळालेल्या खबरीवरुन आरोपी हे फलटन तालुक्‍यातील एका गावातील असल्याबाबत माहीती प्राप्त झाली.

कोंढवा तपास पथकातील पोलीस नाईक सुदाम वावरे व पोलीस आंमलदार ज्योतीबा पवार हे गावात वेषांतर करुन थांबले. यानंतर त्यांनी चोरट्यांची तसेच गुन्हयात वापरलेल्या पल्सर मोटर सायकल बाबत माहीती प्राप्त केली. त्या माहीतीच्या आधारे तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस नाईक सुदाम वावरे, संजीव कळंचे, पोलीस आंमलदार ज्योतीवा पवार, किशोर वळे यांनी मु.पो. मुंजवडी व खुंटे ( ता.फलटन, जि.सातारा) या गावात जावुन आरोपींना ताब्यात घेवुन अटक केली.

आरोपीच्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये आरोपीच्यांकडुन बोपदेव घाटात केलेल्या तीन दरोडयाच्या गुन्हयातील 4 मोबाईल, कोंढवा पोलीस ठाणे, दत्तवाडी पोलीस ठाणे, सासवड पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे व कराड पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हददीमध्ये पल्सर मोटर सायकल चोरीचे 7 गुन्हे त्यातील 7 पल्सर मोटर सायकली असे एकुण 10 गुन्हे उघड आले. या गुन्हयातील एकुण10,86,000 रुपये किंमतीचा मुददेमाल व आरोपीनी गुन्हा करताना वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उप निरीक्षक प्रभाकर कापुरे पोलीस अंमलदार निलेश वणवे, सुदाम वावरे, संजीव कळंबे, जोतीबा पवार, किशोर वळे लक्ष्मण होळकर.आदशेँ चव्हाण,अभिजीत रत्नपारखीयांच्या पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.