पुणे – गेल्या 24 तासांत 65 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 849 बाधितांची नव्याने नोंद झाली आहे. तर, दिवसभरात 3 हजार 896 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील ऍक्टिव्ह करोना बाधितांची संख्या 53 हजार 376 पर्यंत पोहोचली आहे. यापैकी 5 हजार 62 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 1 हजार 50 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 3 लाख 34 हजार 510 झाली आहे.
त्यापैकी 2 लाख 75 हजार 333 रुग्ण बरेही झाले आहेत. तर, 5 हजार 801 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी 22 हजार 466 संशयितांची स्वॅब टेस्ट केली असून, आतापर्यंत 17 लाख 44 हजार 180 संशयितांची स्वॅब टेस्ट केली आहे.