पुणे – शहरातील करोना बाधित मृतांचा आकडा सहा हजार पार गेला असून, “पॉझिटिव्ह’ गोष्ट म्हणजे 5 हजार 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 65 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 14 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. त्यांचा समावेश करून आजपर्यंत 6 हजार 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 373 नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
आजपर्यंत 3 लाख 54 हजार 797 जण बाधित सापडले असून, त्यातील 2 लाख 94 हजार 171 जण बरे झाले आहेत. मात्र ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त असून ती 54 हजार 624 आहे. तर त्यातील 1 हजार 196 जण गंभीर आहेत. याशिवाय 5 हजार 637 जणांवर ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत 18 लाख 32 हजार 157 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या, तर शुक्रवारी 23 हजार 564 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली.