नवे करोनाबाधित पुन्हा साडेतीनशेजवळ

पुणे- करोना बाधितांची संख्या पुन्हा वाढली असून, दिवसभरात नव्याने 346 बाधितांची नोंद झाली आहे. तसेच 287 जणांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढण्याला सुरूवात झाली आहे. आजपर्यंत 4 लाख 84 हजार 702 व्यक्ती बाधित झाल्या असून, त्यातील 4 लाख 73 हजार 126 व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. सध्या 2 हजार 867 सक्रीय बाधित असून, त्यातील 227 जणांची प्रकृती गंभीर आहे; तर 387 बाधितांना ऑक्‍सिजन लावण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांत 11 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यात शहरातील मृतांची संख्या 7 असून, अन्य चार पुण्याबाहेरील आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी मार्चपासून, आजपर्यंत 28 लाख 8 हजार 884 संशयितांच्या स्वॅब टेस्ट झाल्या आहेत. त्यामध्ये बुधवारी केलेल्या 9 हजार 697 टेस्टचा समावेश आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.