पुणे – आमदार विजय काळे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात पत्रके उडवली.
तसेच ‘या आमदाराच करायच काय’, ‘खाली डोक वर पाय’, ‘निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणाऱ्या आमदाराचा निषेध असो’, अशा घोषणा देत नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी राडा घातला. अखेर शहराध्यक्ष गोगावले यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र, त्यांचेही न ऐकता घोषणाबाजी करत कार्यकर्ते सभागृहाबाहेर निघून गेले.