#Prokabaddi2019 : दुसऱ्या विजयासाठी थलाईवाज उत्सुक

स्थळ – हैदराबाद
वेळ – रात्री 7-30 वा.

हैदराबाद – राहुल चौधरीच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यात सहज विजय मिळविणाऱ्या तमिळ थलाईवाज संघास आता दुसऱ्या विजयाचे वेध लागले आहेत. प्रो कबड्डी लीगमधील दुसऱ्या लढतीत त्यांची दबंग दिल्ली संघाशी गाठ पडणार आहे.

गचीबावली स्टेडियमवर आज होणाऱ्या या सामन्यात थलाईवाज संघाची मुख्य मदार चौधरी याच्यावरच आहे. त्याने पहिल्या सामन्यात 12 गुण नोंदवित सुपरटेन कामगिरी केली होती. चढाईत त्याच्याबरोबरच कर्णधार अजय ठाकूर, शब्बीर बापू, रण सिंग व मनजित चिल्ल्रर यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

पकडीबाबत त्यांची मुख्य भिस्त एम.अभिषेक, हिमांशु व अजित यांच्यावर आहे. पहिल्या सामन्यात थलाईवाज संघाने यजमान तेलुगु टायटन्सला 39-26 असा धक्का दिला होता.

दबंग दिल्लीकडून खेळणारा मिराज शेख हाच थलाईवाजसाठी धोकादायक खेळाडू आहे. इराणचा हा खेळाडू खोलवर चढाया व भक्कम पकडी करण्यात माहीर मानला जातो. त्याच्याबरोबरच अमित काडियन, नवीनकुमार व जोगिंदरसिंग नरवाल यांच्याकडून चांगल्या चढायांची अपेक्षा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)