प्रियांकाच्या रॅलीत चोरांचा धुमाकूळ

लखनौ -कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या रोड शोवेळी सोमवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रोड शोमध्ये सहभागी झालेल्या कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचे स्मार्टफोन चोरीला गेले आहेत. कन्नौज आणि बाराबंकी येथून अनेक कार्यकर्ते प्रियांका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते.

कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोड येथे पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांचे स्मार्टफोन आणि अन्य महत्त्वाचे सामान चोरले. तसेच चोरांनी अनेक नेत्यांच्या खिशातील हजारो रुपये, लायसन्स आणि एटीएम कार्डसहित अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली.

चोरी झाल्याची माहिती मिळताच संतप्त कॉंग्रेस नेत्यांनी एका पकडून पोलीस ठाण्यात गेले. मात्र तरीही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.