प्रियांकानी प्रचार केलेल्या मतदारसंघात कॉंग्रेसचा पराभव

नवी दिल्ली – कॉंग्रेसतर्फे प्रियांका गांधी यांनी स्वत:ला निवडणुकीच्या प्रचारात झोकून दिले होते. मात्र त्यांनी जिथे-जिथे जाऊन कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार केला त्या सगळ्या मतदारसंघात कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. गांधी कुंटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये स्वत: राहुल गांधीही पराभूत झाले. त्यांच्यासाठीही प्रियांका गांधींनी अमेठीत दिवसरात्र प्रचार केला होता.

प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधी यांच्यासाठी रायबरेली आणि राहुल गांधी यांच्यासाठी वायनाड इथे प्रचार केला होता. या दोन जागा मात्र कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. कॉंग्रेसचा पडता काळ सुरू झाला तेव्हा देखील त्यांना साथ देणाऱ्या पंजाबमध्ये प्रियांका जिथे प्रचारासाठी गेल्या तिथेही कॉंग्रेस हरली. प्रियंका यांनी भठींडा आणि गुरुदासपूर इथे प्रचार केला होता.

उत्तर प्रदेशाशिवाय प्रियांका गांधी यांनी देशभरात 12 लोकसभा मतदारसंघात प्रचार केला होता. यातील 11 लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. प्रियांका गांधी यांच्यामुळे नव्या जागांवर कॉंग्रेसला विजय मिळेल अशी आशा राहुल गांधींना वाटत होती, मात्र नव्या जागा दूर राहिल्या आहे त्याही जागा कॉंग्रेसने गमावल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.