प्रियांका जबाबदारी पार पाडतील – वढेरा

नवी दिल्ली – प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, तू माझी खरी मैत्रीण आहे. योग्य सहचारिणी आणि माझ्या मुलांसाठी चांगली आई असल्याचे तू सिद्ध केले आहेस. परंतु आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे. मला माहीत आहे की, तू तुझी जबाबदारी योग्य पद्धतीने निभावशील.

रॉबर्ट वढेरा पुढे लिहितात, प्रियांकांची भारतीय जनतेनं काळजी घ्यावी. अशी पोस्ट रॉबर्ट वढेरांनी टाकल्यामुळे सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत आहे. कॉंग्रेसच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्य़ावर आहेत. प्रियांका राजकारणात सक्रिय होत असल्याच्या निमित्ताने कॉंग्रेसने राज्यात जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. उत्तर प्रदेशात गलितगात्र अवस्थेत असलेल्या कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियांका यांच्या खांद्यावर आहे. समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा आणि सत्ताधारी भाजपाचा मुकाबला करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. बदलाव की आंधी, प्रियांका गांधी अशा घोषणा रोड शो दरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. याशिवाय लखनौमध्ये प्रियांका आणि राहुल गांधींचे पोस्टरदेखील लावण्यात आले. प्रियांका यांच्या रोड शोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधियादेखील उपस्थित आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)